उमाजी नाईक स्मारक आणि भवन उभारण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करा ; मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील

सांगोला शहर आणि तालुक्यात तसेच माढा लोकसभा मतदारसंघात रामोशी समाज मोठ्या प्रमाणात आहे. गेली अनेक वर्षे हा समाज सांगोला शहर आणि तालुक्यात गुण्या गोविंदाने नांदत आहे. सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या प्रेरणादायी महापुरुषाचे भव्य स्मारक आणि राजे उमाजी नाईक भवन व्हावे ही सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम समाज बांधवांची अनेक वर्षांची मागणी आहे.

सांगोला तालुक्यातील तमाम तरुणाईला राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापासून आणि दैदिप्यमान इतिहासापासून प्रेरणा मिळावी यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी राजे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक भवन व्हावे यासाठी राज्य सरकारने लवकरच पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.