लाडक्या गणरायाला मंगळवारी गणेशभक्त निरोप देणार असून, विविध मंडळांकडून लेझीम, झांज, डीजेच्या तालावर थिरकत बाप्पाला निरोप देत असतात. दरम्यान, श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरात फिक्स पाँईट, प्रमुख 14 ठिकाणी गणेश विसर्जन, 78 ठिकाणी गणेशमूर्ती संकलन व विसर्जन मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला आहे.गणेशोत्सव विसर्जनासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
तीन पोलिस उपायुक्त, सहा सहपोलिस आयुक्त, एसआरपीएफची एक तुकडी असणार आहेत. 1344 होमगार्ड बंदोबस्तात असणार आहेत.
सोलापूर शहरात गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. अनंत चतुदर्शी निमित्त सोलापूर शहरात श्री गणेशमूर्तींचे सार्वजनिक मिरवणुकीद्वारे आणि स्वतंत्ररीत्या विसर्जन होणार आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच विसर्जन शांततेत व सुरळीत व्हावे यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पोलिस बंदोबस्तात पोलिस उपायुक्त 3, सहा पोलिस आयुक्त 6 असणार असून, यापैकी एक बाहेरील आहे, पोलिस निरीक्षक 26, सपोनि व पोसई एकूण 97 असणार असून त्यापैकी स्थानिक 72 तर बाहेरील 25, पोलिस अंमलदार स्थानिक 1319, बाहेरील 25 असे एकूण 1344, होमगार्ड बाहेरील 436, एसआरपीएफची एक कंपनी असणार आहे.