Vegetables Rate Hike : सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री! पितृ पक्ष सुरु होताच महागल्या भाज्या…..

पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झालीये. त्यामुळे आवक घटली असताना आठवडेबाजारात तरकारी मालासह भाजीपाल्याचा भाव चांगलाच वाढला आहे.गणेशोत्सव संपताच पितृ पक्षाला सुरुवात झाली. पितृ पक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी आख्यायीकेनुसार विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. त्यात एक मिश्र भाजी ही अगत्याने असतेच. मात्र यंदा पावसाच्या अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेय. विविध भाज्यांची बाजारात आवक घटली आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टीने आणि तिप्पटीने वाढून गगणालाच भिडले आहेत. यात भाज्यांची चव वाढविणारी कोथींबीर आणि मेथीही महागली आहे.