‘कोल्हापूर-पुणे वंदे भारत’चे वेळापत्रक जारी; कशी करता येईल Online Booking, कुठे असणार थांबा?

कोल्हापूर ते पुणे मार्गावर नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रवाशांतून स्वागत होत आहे.मात्र, या रेल्वेच्या वेळा सोयीच्या असाव्यात, अशा अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.

विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील जवळपास 50 हजारांवर आयटी अभियंते पुण्यात आहेत.त्यांच्यासह रोजची व्यक्तिगत प्रवासी संख्या 3 ते 8 हजारांच्या घरात आहे. असा प्रवासी वर्ग कॅच करण्याची संधी रेल्वेला आहे.

त्यासाठी ‘वंदे भारत’ची वेळ सोयीची करणार का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. दरम्यान, रेल्वे विभागाने नुकतेच एक वेळापत्रक जारी केले आहे. यामध्ये 18 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे 8.15 तास ते 13.30 तास अशी प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि सोमवारी ही एक्स्प्रेस धावणार आहे.

या रेल्वेचा मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा असा थांबा असणार आहे. त्यामुळे या प्रवाशांना आता रेल्वेसाठी बुकिंग करता येईल. यासाठी https://irctc.co.in या वेबसाइटवर जाऊन आपल्याला ऑनलाइन जागा आरक्षित करता येणार आहे.

याशिवाय, https://enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊन किंवा NTES ॲप वापरुन देखील आपल्याला रेल्वे बुकिंग करता येणार आहे.