इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी जाहिर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी मदन कारंडे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी लाल निशाण पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, साने गुरुजी विचार मंच, विकली मार्केट व्यापारी संघटना, जामा सोशल फौंडेशन, साथी फौंडेशन, साने गुरुजी समविचारी मंच, श्रमिक संघटना, समाजवादी महिला सभा, श्रमिक महिला मोर्चा अशा पक्ष व संघटनांचा मदन कारंडे यांना जाहिर पाठिंबा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उमेदवार मदन कारंडे, शशांक बावचकर, बजरंग लोणारी, जावीद मोमीन, पद्माकर तेलसिंगे, मुकूंद माळी, वसंत कोरवी, सुनिल बारवाडे, उषा कांबळे, अंजना रेंदाळकर, प्रकाश सुतार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.