ईश्वरपूर तालुक्यात वृद्धेवरील अत्याचार प्रकरणी दोषी व्यक्तीस कठोर कारावास

तालुक्यातील पश्चिम भागात पील एका गावातील ७५ वर्षीय वृद्ध महिलेवरील अत्याचार प्रकरणी सोमनाथ चंद्रकांत शिंदे (२८, रा.पेठ, ता. वाळवा) याला दोषी धरुन – न्यायालयाने १७ महिन्यांची कठोर कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हा निकाल पहिल्या जिल्हा व सत्र – न्यायाधिश श्रीमती ए.एच. काशिकर यांनी दिला.

ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी एक वाजण्याच्या सुमारास घडला होती. पीडित महिला ही आपल्या घरी एकटीच रहात होती. दुपारच्या सुमारास सोमनाथ शिंदे याने महिलेच्या घर-ात घुसून तिचे तोंड दाबून धरत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या वृध्देने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. तिला उपचारासाठी नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.