इस्लामपूर मतदारसंघात महायुतीकडून एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली! निशिकांत पाटील यांचा महायुतीच्या उमेदवारीवर दावा

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. इस्लामपूर मतदारसंघात असलेला जयंत पाटील यांचा बालेकिल्ला विधानसभेला 21000 मतांनी ढासळेल असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केलेला आहे.

महायुतीतून उमेदवार अद्याप निश्चित नाही परंतु आपण गेल्या पाच वर्षापासून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहोत. महायुतीकडून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले आहेत. गेल्या काही वर्षात इस्लामपूर मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेले आहेत. भाजप शिवसेना यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी देखील दिलेला आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात एकच उमेदवारीच्या हालचाली सध्या सुरू आहेत. भाजपमधील अंतर्गत संघर्ष मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गत निवडणुकीत मतांची टक्केवारी पाहता महायुतीकडून उमेदवारीसाठी मी प्रमुख दावेदार असेन असा विश्वास देखील निशिकांत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे.

महायुतीतून उमेदवार अद्याप निश्चित नसले तरी इस्लामपुरात पहिली पसंती मलाच असेल असाही दावा यावेळी निशिकांत पाटील यांनी केलेला आहे.