सभासद नोंदणीतून राष्ट्रवादी घराघरात पोहोचवणार

निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आष्टा शहरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची सभासद नोंदणी अभियान जोरदारपणे राबवणार असून घराघरात राष्ट्रवादी पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन निशिकांत दादा युथ फाऊंडेशनचे संस्थापक प्रवीण माने यांनी केले. आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अ.प. पार्टी सभासद नोंदणी अभियान मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी संदीप गायकवाड, दादासाहेब वाघमारे, संदीप आवटी, संजय सावंत, उदय कवठेकर, नारायण वायदंडे, राहुल थोरात, अमोल लोखंडे, अक्षय अवघडे, जयवंत खोत, अविनाश काळोखे, अमोल चाळके, अरबाज मुजावर, निलेश पाटील, मिथुन भंडारे, सचिन महकाळे, दिलीप जगदाळे, सखाराम ढोले, विक्रम कटारे, सुरेश मोतकट्टे, भैय्या मंडले, अक्षय घस्ते, पवन गायकवाड, रवी चव्हाण, शोयब संदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवीण माने म्हणाले, आष्टा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करणार आहोत. अजितदादा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला कर्तृत्ववान नेतृत्व लाभले आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक या नेतृत्वात आहे. निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्यातून आष्टा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्कम बांधणी करणार आहोत. राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आष्टा शहराच्या विकासाची गती अधिक वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करणार आहोत. स्वागत आणि प्रास्ताविक संदीप गायकवाड यांनी केले. संजय सावंत यांनी आभार मानले.