पॅरासिटामॉल सह 50 हून अधिक औषधांवर बंदी! या गोळ्या चुकूनही घेऊ नका

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) गुणवत्ता चाचणीत 53 औषधे नापास केली आहेत. यामध्ये बीपी, मधुमेहाच्या औषधांचा देखील समावेश आहे. CDSCO ने बंदी घातलेल्या औषधांमध्ये डायक्लोफेनाक, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोल आणि काही व्हिटॅमिन औषधांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे ही औषधे देशातील अनेक मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या बनवतात. पण त्या औषध गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी ठरले. त्यामुळे त्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे.आपल्याला साधारण ताप आला तर आपण पॅरासिटामॉल ही गोळी घेतो. पण आता या गोळीबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. ही गोळी गुणवत्तेच्या चाचणीत फेल झाली आहे. याशिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, अनेक मधुमेहविरोधी औषधांचाही या यादीत समावेश आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, ग्लुकोअमायलेज, पेक्टिनेस, एमायलेस, प्रोटीज, अल्फा गॅलॅक्टोसिडेस, सेल्युलेज, लिपेज, ब्रोमेलेन, झायलेनेज, हेमिसेल्युलेज, लैक्टेज, बीटा-ग्लुकोनेज, माल्ट डायस्टेस यांचा धोका आहे. ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे त्यात केसांच्या उपचारांसाठी वापरले जाणारे अँटीपॅरासायटिक औषधांचाही समावेश आहे. सरकारने लोकांना या औषधांच्या जागी इतर औषधे वापरण्याचा सल्ला दिला आहे.

गुणवत्ता तपासणीसाठी दर महिन्याला वेगवेगळ्या राज्यांमधून औषधांचे नमुने घेतले जातात आणि नंतर त्यांची चाचणी केली जाते. व्हिटॅमिन सी आणि डी 3 गोळ्या शेलकल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटासिड पॅन-डी, पॅरासिटामोल गोळ्या IP 500 मिग्रॅ, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाब औषध तेलमिसार्टन इत्यादींसह 53 औषधे आहेत,ही गुणवत्ता चाचणीत उत्तीर्ण झालेली नाहीत.