इस्लामपूरात राष्ट्रवादीतर्फे दारू नको, दूध प्या हा अनोखा उपक्रम!


आजकाल अनेक नवनवीन उपक्रम प्रत्येक गावात राबविताना आपल्याला पहायला मिळत आहेत. असाच एक अनोखा उपक्रम इस्लामपुरात संपन्न झाला. वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनसमोर युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून दारू नको, दूध प्या हा उपक्रम राबविला. या उपक्रमास इस्लामपूर, आष्टा, तसेच तालुक्यातील नागरिकांनी विशेषतः युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांचे युवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभले.

प्रा. शामराव पाटील, अँड. चिमण डांगे, नेर्ल्याचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील, आनंदराव पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, सचिन पाटील, युवकचे इस्लामपूर शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष राजकेदार आटूगडे, मिडिया सेलचे तालुकाध्यक्ष सुशांत कोळेकर यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.


युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, माणिक पाटील, संदीप पाटील, विनायक यादव, प्रविण
पाटील, महेश पाटील, विश्वास कदम, शुभम पाटील, संदीप पाटील (डिग्रज), असिफ पटेल, रोहित तोरस्कर, दिग्विजय पाटील, लखन पवार, रोहित देवकर, सुधीर शेटे, सतिश जाधव, सुनिल शेटे, श्रीकांत बारपटे, सुहास पवार, प्रमोद पाटील, निखिल शिंदे यांच्यासह युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.