पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने सन 2024- 25 साठी 24 संसदीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. भाजपाचे प्रमुख मित्र पक्षाव्यक्तिरिक्त महाराष्ट्रातील त्यांचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येक एक समितीचे नेतृत्व करण्यात संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील माने यांना देशाचे केंद्रीय गृह समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या वेळी खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचा आभार मानले.
खास.धैर्यशील माने यांची केंद्रीय गृहसमिती सदस्यपदी निवड
