हुपरीत 3 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर दरम्यान नवरात्रउत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

आता गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने हुपरी शहराची कुलस्वामिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे आणि याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन भक्त मंडळाने केले आहे.

या कालावधीमध्ये दररोज सकाळी अभिषेक, सामुदायिक स्त्रोत पठण, देवीची गाणी, गोंधळी गीते, धनगरी ओव्या, रेणुका देवीची गाणी, वाघ्या मुरळी, देवदासी गीते आदी धार्मिक कार्यक्रम व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सायंकाळी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.