सध्याच्या काळात हाणामारीच्या प्रकारात खूपच वाढ झालेली पहायला मिळते. छोटोसे कारण हे खूपच मोठे उग्र रूप धरण करते. हुपरी येथे शिवाजीनगर भागातील टपरीसमोर एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिस ठण्यासमोर मोठ्या संख्येने गोळा झालेल्या जमावास पोलिसांनी हुसकावून लावले. याप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
