बावची -इस्लामपूर एस.टी. फेऱ्यांची विद्यार्थी पालकांतून मागणी…

बाबची गोटखिंडी येथून इस्लामपूरला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. बहुतांशी शाळा, महाविद्यालय सकाळच्या सत्रात असल्यामुळे इस्लामपूरला जाण्यासाठी सकाळी बसस्थानकावर मोठी गर्दी होत असते . अष्टाहुन बावची, गोडखिंडी फाटा मार्गे जाणाऱ्या पहिली बस सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी दुसरी बस येडेनिपाणी मार्गे जाते. परंतु या दोन्ही बसमध्ये एकच गर्दी असते. बहुतांशी विद्यार्थी ,विद्यार्थिनींना उभे राहून प्रवास करावा लागतो .येडेनिपाणी मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असते. काही वर्षांपूर्वी अष्टा इस्लामपूर गोटखिंडी मधून सात वाजून दहा मिनिटांनी गोटखिंडी फाटा मार्गे इस्लामपूरला जाण्यासाठी तिसरी बस होती .परंतु ती सध्या बंद आहे .गोटखिंडीमधुन जाणारी आणखी एक बस फेरी सुरू करावी, अशी विद्यार्थी पालकांन कडुन मागणी होत आहे.