कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि सर्किट बेंच या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी उद्या मंगळवारी 25 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्यावेळी कोल्हापूर बंद ठेवण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत होते.दरम्यान, गनिमी काव्याने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास काळे फासण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
मंगळवारी वाहनधारकांनी पुकारलेल्या बंदला यावेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला. कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात जमून बंदचे आवाहन करण्यात येणार आहे.