हुपरी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून प्रचंड वर्दळ असलेल्या शिवाजी छत्रपती महाराज चौकात गणेश मंदिराचे कुलुप तोडून मंदिरातील दानपेटी लंपास केली आहे. माळ भाग परिसरात हनुमान मंदिरातही दानपेटी लपास केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कैद असून दानपेटी चोरीला एक आठवड्यात ही दुसरी घटना आहे .कोल्हापूर हुपरी रोडवर प्रचंड रहदारी असलेल्या चौकात हा गंभीर प्रकार घडल्याने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत .पुजारी पहाटे पूजा करण्यासाठी आल्यानंतर मंदिराची चोरी झालेली घटना लक्षात आली. याची माहिती हुपरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत ठसे तज्ज्ञासह ,श्वास पथकालाही पाचारण करण्यात आणले होते.
चोरट्याने माग काढत असताना चोरी केलेल्या दानपेटी नदीवेस परिसरात चोरट्याने फोडून त्यातील 10 हजार रुपये याहून अधिक रक्कम लंपास करून दानपेटी फोडून टाकली आहे .मंदिर पुजारी विशाल एकनाथ विभूते यांच्या फिर्यादीवरून मंदिरात बाजूला ठेवलेल्या टॉवेल देवीच्या दागिन्यावर पडल्याने दागिने सुरक्षित राहिले आहेत .मंदिरातील सीसीटीव्ही मध्ये चोरट्याने चोरी करताना व्हिडिओ कैद झाले आहे . दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलीस ठाण्याला भेट दिली. व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत चांगलीच कानउघाडणी केली.