सोलापुरातून मुंबई-पुण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून विमानसेवा?

सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना विमान मार्ग निश्चित करण्यासाठी सोलापूर-पुणे आणि सोलापूर-मुंबई असे दोन प्रस्ताव निविदा प्रक्रियेसाठी पाठवले आहेत.

साधारण 15 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, पुणे या दोन शहरांसाठी विमानाचे पहिले उड्डाण होण्याची शक्यता आहे. ‘फ्लाय 91’ या कंपनीसोबत इंडिगो कंपनीच्या अधिकार्‍यांनीही रविवार (दि. 29) विमानतळाची पाहणी केली होती.

इंडिगो आणि फ्लॉय 91 या दोन कंपन्यांनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. उडान योजना चालू होण्यास डिंसेवर-जानेवारी लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सोलापुरातून विमान सेवा चालू करण्यासाठी विशेष योजनेस मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.