Career Tips: 12 वी नंतर काय करायचे? करा ‘हे’ डिप्लोमा कोर्स कमी वयात कमवाल पैसे…..

मित्रांनो बारावी हे करिअरच्या दृष्टिकोनातून खूप त्याच्याशी शैक्षणिक वर्ष असून याला करिअरच्या दृष्टिकोनातून एक टर्निंग पॉईंट देखील म्हटले जाते. बारावीनंतर बरेच जण उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात व उच्च शिक्षणाची तयारी किंवा भविष्यातील करिअरच्या दृष्टिकोनातून बारावी खूप महत्त्वाचे असे शैक्षणिक वर्ष असते.

बारावीनंतर असे अनेक डिप्लोमा कोर्स आहेत जे चांगल्या पगाराची नोकरीची हमी देतात. पण अशा कोर्सेसला प्रवेश घेऊन तुम्ही तुमचे करिअर चांगल्या पद्धतीने सेट करू शकतात.

बारावीनंतर हे आहेत महत्त्वाचे डिप्लोमा कोर्स

हॉस्पिटलिटी आणि टुरिझम : हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा, टुरिझम मॅनेजमेंट तसेच फूड अँड बेवरेज मॅनेजमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट मधील डिप्लोमा कोर्सेसचा समावेश होतो.

मॅनेजमेंट अँड बिझनेस : यामध्ये डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन फायनान्स मॅनेजमेंट या डिप्लोमा कोर्सेसचा यात समावेश होतो.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान : यामध्ये पॉलिटेक्निक डिप्लोमा, डिप्लोमा इन कॅम्पुटर सायन्स, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या कोर्सेसचा समावेश होतो.

कला आणि डिझाईन : यामध्ये डिप्लोमा इन फॅशन डिझाईनिंग, डिप्लोमा इन ग्राफिक डिझायनिंग, डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईनिंग आणि डिप्लोमा इन फोटोग्राफी या डिप्लोमा कोर्सेसचा समावेश होतो.

हेल्थकेअर आणि मेडिकल : यामध्ये नर्सीगमध्ये डिप्लोमा, फार्मसीमध्ये डिप्लोमा, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा आणि डिप्लोमा इन हेल्थकेअर मॅनेजमेंट इत्यादी डिप्लोमा कोर्सेसचा यामध्ये समावेश होतो.

या व्यतिरिक्त तुम्ही पत्रकारीतेमध्ये डिप्लोमा करू शकतात किंवा मास कम्युनिकेशन डिप्लोमा आणि डिप्लोमा इन सोशल वर्कमध्ये देखील डिप्लोमा पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात.

साधारणपणे या सगळ्या पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी एक ते तीन वर्षांचा असतो व हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी मिळून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.