अलीकडच्या काळामध्ये चोरी, गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांमध्ये चोरट्यांनी अगदी मंदिरांमध्ये देखील डल्ला मारण्यास सुरुवात केलेली होती. आता हुपरी पंचक्रोशीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मंदिराच्या दानपेटीनंतर आता शाळांकडे लक्ष त्यांनी केंद्रित केलेले आहे. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील अंगणवाडी क्रमांक 160 मधील सोलर पॅनल बॅटरी, इन्वर्टर व छताचा फॅन सुद्धा आज्ञात चोरट्यानी लंपास केलेला आहे. याचे बाजार मूल्य 50 हजार हून अधिक असून नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
ही घटना शाळा बंद झाल्यानंतर घडलेली आहे. सकाळी शाळांमध्ये आल्यानंतर निदर्शनास आली. पोलीसानी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. अंगणवाडी सेविका सविता बाळासो चव्हाण जामकर गल्ली पट्टणकोडोली यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे.
पोलीस प्रशासनाने जागते रहोच्या भूमिकेत राहायला पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये या घटनांमध्ये वाढ होईल अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होऊ लागलेली आहे.