आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना!

आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या दालनात अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने सर्व विभागातील अत्यावश्य कामांचा आढावा घेण्यात आला. कामांची वेळेत निर्गत करावी अन्यथा संबंधित विभाग प्रमुखांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिवटे यांनी दिला.