इचलकरंजीत उद्या देवदर्शन पदयात्रेचे आयोजन

इचलकरंजी येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने विजयादशमी दसऱ्यानिमित्त देवदर्शन पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा शनिवार ता. १२ ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता श्री शिवतीर्थ येथून सुरु होणार आहे. या पदयात्रेचा मार्ग श्री शिवतीर्थ, भाग्यरेखा टॉकीज, आण्णा रामगोंडा शाळा, आयजीएम हॉस्पिटल, बंडगर माळ, तीन बत्ती चौक, श्री तुळजामाता मंदिर, लिंबू चौक, काडापुरे तळ, छ. संभाजी महाराज चौक ते श्री शिवतीर्थ असा असून येथे समारोप होणार आहे. तरी सर्व हिंदू बांधवांनी व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.