दिपकआबांचा शब्द महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पाळला….

बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायामध्ये महिलांनी गरुडझेप घेतली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक क्रांती घडत असताना बचत गटाच्या सर्वांगीण विकासासाठी व संघटनात्मक बांधणीसाठी सर्वप्रथम महिला सभागृह असणे गरजेचे आहे. सभागृह बांधकामासाठी अनेकदा महिलांकडून मागणी होत असताना या मागणीची दखल घेऊन माननीय आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी पुढाकार घेऊन सांगोला तालुक्याच्या विविध गावांमध्ये सभागृह बांधकामासाठी निधीची मागणी केली आणि तो निधी मंजुरीही करून आणला.

बचत गटातील महिलांचे सबलीकरण व्हावे व महिलांना गावांमध्ये व्यासपीठ निर्माण व्हावे या दृष्टीने सांगोला विधानसभा मतदारसंघातील 24 गावांमध्ये महिला सभागृह उभारणीसाठी चार कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. माननीय आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या मागणीनुसार महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी हा निधी दिलेला आहे. लवकरच सभागृह बांधकामाची कामे सुरू होणार असल्याची माहिती माननीय आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली आहे.

अनेक वर्षाच्या मागणीनंतर आता महिलांसाठी स्वतंत्र दालन उभा राहणार असल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील बचत गटाच्या महिलांकडून महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे व माननीय आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार मानले जात आहेत.