कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले ‘मॅक’च्या नूतन अध्यक्षपदी मोहन कुशिरे व उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची निवड करण्यात आली.ऑनररी सेक्रेटरीपदी सुरेश क्षीरसागर, तर ऑनररी ट्रेझररपदी अमृत यादव यांची एकमताने निवड झाली. संचालक मंडळाच्या ११ व्या सभेत ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कै. रामप्रताप झंवर सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. या निवडी पुढील एक वर्षासाठी करण्यात आल्या.
नूतन पदाधिकारी उद्योजक आणि कामगारांच्या विविधकामांसाठी कार्यरत राहणार आहेत. संस्थेचे मावळते अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष व संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी, संजय पेंडसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल आदी मान्यवर उद्योजक उपस्थित होते.