स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC) मार्फत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (सी.ए.पी.एफ.) आणि सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स (एस.एस.एफ.) मध्ये काँस्टेबल (जीडी) व आसाम रायफर्ल्स (एआ) मध्ये रायफलमन (जीडी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये शिपाई पदावर भरती. एकूण रिक्त पदे – ३९,४८१ (पुरुष – ३५,६१२ आणि महिला – ३,८६९). एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. पात्र माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास या जागा इतर उमेदवारांमधून भरल्या जातील.
CAPFs आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदे ही राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय निश्चित केली आहेत. त्यामुळे उमेदवारांना डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागेल. SSF मधील काँस्टेबल (जीडी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये शिपाई पदे अखिल भारतीय पातळीवर भरली जातील. दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
फोर्सनुसार रिक्त पदांचा तपशिल –
(१) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स – एकूण १५,६५४ पदे.
पुरुष – १३,३०६
महिला – २३४८
(२) सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स – एकूण ११,५४१ पदे.
पुरुष – ६४३०
महिला – ७१५
(३) सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स – एकूण ११,५४१ पदे.
पुरुष – ११,२९९
महिला – २४२
(४) सीमा सुरक्षा बल – एकूण ८१९ पदे.
पुरुष – ८१९
(५) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस – एकूण ३,०१७ पदे.
पुरुष – २५६४
महिला – ४५३
(६) सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स – एकूण ३५ पदे.
पुरुष – ३५
(७) आसाम रायफल्स – एकूण १,२४८ पदे.
पुरुष – १,१४८ (अजा – १२४, अज – २२३, इमाव – २०५, ईडब्ल्यूएस- १०९, खुला – ४८७).
महिला – १००
(८) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो – एकूण २२ पदे.
पुरुष – ११ (अज – १, इमाव – ५, खुला – ५).
महिला – ११ (इमाव – ४, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ६).
पात्रता : दि. १ जानेवारी २०२५ रोजी १० वी उत्तीर्ण.
वेतन श्रेणी : शिपाई (एन.सी.बी.) – पे लेव्हल-१ रु. १८०००-५६९००/- अंदाजे वेतन दरमहा रु.३३८००/- इतर सर्व पदांसाठी पे-लेव्हल – ३ (रु. २१,७०० – ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४३,८००/-.
वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२५ रोजी) १८ ते २३ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २००७ दरम्यानचा असावा.) (इमाव – २६ वर्षेपर्यंत, अजा/अज – २८ वर्षेपर्यंत) (१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्रात नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.)
अर्जाचे शुल्क : रु. १००/-. (महिला/ अजा/ अज/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने दि.१५ ऑक्टोंबर २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल.
ऑनलाईन अर्ज https:// ssc. gov. in ( One time Registration gt; Filling of Online Application) ( Latest Notification Tab Section gt; Apply gt; Constable- GD in CAPFs, SSF Rifleman ( GD) in Assam Riffles २०२४) वर दि. १४ ऑक्टोंबर २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत करावेत.