Ind vs NZ 1st Test: आजपासून भारत- न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.मालिकेतील पहिला सामना आज पासून रंगणार असून बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर हा सामना असेल. पहिल्या कसोटी सामनादरम्यान हवामान खराब राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा सामना उशीराने सुरु होऊ शकतो.भारत दौऱ्याआधी न्यूझीलंडला श्रीलंकेमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध अडखळताना पाहिले होते.भारताविरुद्ध जागतिक दर्जाच्या फिरकी माऱ्याविरुद्ध खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची मोठी कसोटी लागेल. पहिल्या कसोटी सामन्याला शुभमन गिल मुकण्याची शक्यता आहे.

दुखापतीमुळे शुभमन गिल पहिल्या कसोटीमधून बाहेर पडू शकतो. बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने भारताने जिंकली. या विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिले स्थान आणखी बळकट केले आहे.पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.