भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात पहिली टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
या मालिकेसाठी इंग्लंडने रविवारी आपला संघ जाहीर केला आहे. जॉस बटलरची टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून यजमानांसोबत पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळत आहे. ही कसोटी मालिका 7 जानेवारीला संपणार आहे.
या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया 22 जानेवारीपासून मायदेशात इंग्लंडसोबत टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे.टीम इंडिया इंग्लंडसोबत टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे 2025 मध्ये इंग्लंडचा संघ प्रथम भारत दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारीला होणार आहे. दुसरा सामना 25 जानेवारीला होणार आहे.त्याचबरोबर मालिकेतील तिसरा सामना 28 जानेवारीला होणार आहे.
चौथा सामना 31 जानेवारीला होणार आहे. तर, या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दुसरा सामना 9 फेब्रुवारीला होणार आहे. तर, मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघही लवकरच जाहीर केला जाणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड टी 20 आंतरराष्ट्रीय वेळापत्रक
पहिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामना: 22 जानेवारी 2025, कोलकाता (ईडन गार्डन्स)
दुसरा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना: 25 जानेवारी 2025, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)
तिसरा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना: 28 जानेवारी 2025, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
चौथा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना: 31 जानेवारी 2025, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
पाचवा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना: 02 फेब्रुवारी 2025, मुंबई (वानखेडे स्टेडियम) टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड
एकदिवसीय मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली वनडे: 6 फेब्रुवारी 2025, नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
दुसरी वनडे: 9 फेब्रुवारी 2025, कटक (बाराबती स्टेडियम)
तिसरी वनडे: 12 जानेवारी 2025, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)