विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार याबद्दल तर तर्कवितर्क, चर्चा होत असताना पाहायला मिळतच आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटावे असे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून सुरू झालेले आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष मला निवडणूक लढविण्याची संधी देतील यापूर्वी दोन वेळा मी निवडणूक लढवलेली आहे. गेली 25 वर्षे या मतदारसंघात परिचित असून मी स्थानिक आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक माझ्यात आहे. सर्वच नेत्यांनी मला आशीर्वाद दिला असून जनता माझ्यासोबत आहे असे मत भाजप नेते भास्कर शेटे यांनी व्यक्त केलेले आहे.
