इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अनेक विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी आचारसंहिता लागण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सतत पाठपुरावा केला आणि त्यातून स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सोयी सुविधा पुरविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचे देखील सहकार्य लाभलेले आहे. इचलकरंजी मतदारसंघातील शहरासह ग्रामीण भागातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध आमदार प्रकाश आवाडे यांनी करून दिलेला आहे.
मागील वर्षभरात त्यांनी विकास कामांचा धडाकाच लावला असून कोट्यवधींचा निधी खेचून आणलेला आहे. त्याच अनुषंगाने स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सोयी सुविधा पुरविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे. यामुळे प्रलंबित कामे मार्गी लागणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.