सोशल मीडियावर मुलीची अश्लील पोस्ट करून बदनामी, युवक जेरबंद

सोशल मीडियावर मुलीची अश्लील पोस्ट करून बदनामी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. अनिकेत अंकुश गायकवाड (वय २५) असे आरोपीचे नाव असून त्याला खानापूर, ता. तुळजापूर, जि.धाराशीव येथून ताब्यात घेण्यात आले.या प्रकाराबाबत पीडित मुलीने ५ जानेवारी रोजी पोफाळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.या प्रकरणात पीडितीच्या इन्स्टाग्राम व फेसबुक अकाउंट कोणीतरी वापरून तिची बदनामी करत आहे.

तिच्या इन्स्टाग्राम आयडीवर अश्लील शब्दरचना टाकून व्हायरल करत आहे या तक्रारीरनंतर पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर आरोपी मोबाईल सिमचा वापर न करता केवळ इंटरनेटचा वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता.

अखेर यवतमाळ सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. अनिकेत गायकवाडला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला. पीडित मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख करून मुलीचे डिटेल्स प्राप्त केले. त्यानंतर तिची बदनामी केल्याचे आरोपीने सांगितले.

आरोपीकडून मोबाईलही जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलिस अधीक्ष कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ हनुमंत गायकवाड, ठाणेदार पंकज दाभाडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक आशिष झिमटे, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्याम लांडगे, आकाश पाझारे, हिंमत बंडगर यांनी पार पाडली.