खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला!

तीन दिवसांपूर्वी भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर आमदार सदाभाऊ खोत यांच्या सोबत भेट घेतली होती. या भेटीनंतर आज 21 ऑक्टोबर धनंजय महाडिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले.त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तरमधून आणि शिराळा मतदारसंघासाठी धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत, तर शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्यासाठी धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारी संदर्भात महाडिक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.