शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीची पहिली मतदार यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये खानापूर मतदारसंघातून सुहास भैया बाबर यांना निवडणूक लढविण्याची लढविण्यासाठी नाव जाहीर केले. पहिल्याच यादीमध्ये सुहास भैया बाबर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
सुहास भैया बाबर म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघातून पहिल्याच यादीत नाव जाहीर केल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. गेल्या 50 वर्षाभरामध्ये भाऊंच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलेले आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. खूप मोठा विश्वास पक्षाने अनिलभाऊंच्या कार्यकर्त्यांनी भाऊंच्या पश्चात माझ्यावर दाखवला त्यामुळेच मला पहिल्या यादीमध्ये निवडणुकीचे तिकीट मिळाले. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार मा. सुहास भैया बाबर यांनी मानले.
गेली दहा वर्षे मी लोकांच्या संपर्कामध्ये आहे. अत्यंत प्रामाणिकपणे मी काम केलेले आहे. परंतु अनिल भाऊंच्या पश्चात कामाची गती राखणे आमच्यासाठी खूपच महत्त्वाची होती.अनिल भाऊंनी लोकांना शब्द दिले होते ते शब्द पूर्ण करणे खूपच महत्त्वाचे होते आणि त्यातीलच म्हणजे टेंभू योजना आम्ही तो पूर्णत्वास नेलेला आहे. तसेच गेल्या आठ महिन्यांमध्ये हजार कोटींपेक्षा जास्त निधी आपण विकास कामांसाठी या संघासाठी मंजूर करून आणलेला आहे.