खानापूर मतदारसंघातून शिंदे सेनेचे सुहासभैया बाबर व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ॲड. वैभव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा बाबर पाटील गटातील पारंपरिक लढत सहाव्यांदा होणार आहे. विट्याचे पाटील व गार्डीच्या बाबर घराण्यातील नवी पिढी पुन्हा एकदा आमने-सामने आलेली आहे. ही लढत सुहास बाबर व वैभव पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरवणारीआहे.
2004, 2009, 2014 व 2019 अशा सलग चार वेळा अनिल बाबर व ॲड. सदाशिव पाटील अशी लढत झाली होती. दोघांनीही दोन दोन वेळा विजय मिळवला होता. पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या सुहास बाबर व वैभव पाटील यांच्यासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे. या दोन्ही युवा नेत्यांच्या लढतीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे.