इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून युवानेते माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी संजय तेलनाडे हाच सक्षम उमेदवार असल्याचा अनेक राजकीय नेत्यांचं तसेच मतदारसंघातील मतदारांचे ठाम मत आहे. त्यामुळे इचलकरंजीत युवा नेते संजय तेलनाडे यांची एन्ट्री होणार आणि संजय तेलनाडे आमदार होणार यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्यापुढे तिसरा पर्याय देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी महायुतीमधील दोन नेते व भाजपमधून बंडखोरी करणारा एक नेता या तिघांमधून एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठका सुरू आहेत. याचे नियोजन करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबत्ते सुरू होते.
महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झाली नसली
तरी राष्ट्रवादीचे मदन कारंडे व संजय तेलनाडे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपाकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर राजकीय हालचालींना शहरांमध्ये वेग आलेला आहे. तिसरा उमेदवार दिला जाणार की महायुतीतील बंड थंड केले जाणार यावर सर्व चित्र अवलंबून आहे.