वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत यंत्रमाग धारकांची संख्या जास्त असल्याने अनेक बाहेरून लोक कामानिमित्त येऊन येथे स्थायिक झालेले आहेत. पण अलीकडे यंत्रमाग धारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंत्रमाग धारक वैतागलेले आहेत. २७ एच. पी. वरील यंत्रमागधारकांची दोन महिन्यांची पोकळ थकबाकीची रक्कम वगळणेत आली आहे.
परंतू त्यावरील व्याज व दंडाची रक्कम वजा करण्यात आलेली नसून काही कारखानदारांकडून जबरदस्तीने भरून घेतलेली आहे ती परत मिळावी, क्युबिकलची अट काढण्यात येऊन पूर्वीप्रमाणे मल्टीपार्टी वीज कनेक्शन मागेल त्या यंत्रमागधारकांना मिळावे, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासह यंत्रमाग पॉवरलुम असो.च्या शिष्टमंडळाने आमदार राहुल आवाडे यांची भेट घेतली. यावेळी आमदार आवाडे यांनी या संदर्भात लवकरच मुंबईत संबंधीत मंत्री, विभागाचे सचिव व अधिकारी यांचेसोबत बैठक लावणेत येईल असे आश्वासन दिले.