इचलकरंजी विधानसभेसाठी चौथ्या दिवशी २० उमेदवारांनी नेले २६ अर्ज,१ उमेदवार अर्ज दाखल

विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २७९ इचलकरंजी विधानसभा मतदार संघात २५ ऑक्टोबर २०२४ रोजी २० व्यक्ती/उमेदवार यांनी एकूण २६ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आलेले आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांचे नामनिर्देशन पत्र आज दाखल झाले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. उमेदवारी अर्ज नेणाऱ्या मध्ये बाळकृष्ण काशिनाथ म्हेत्रे,प्रदिप भिमसेन कांबळे,आकाश रमेश शेळके,हिंदूराव तुकाराम शेळके,अरुण बजरंग बुचडे,मुदस्सर मिरासाहेब समडोळे,सुनंदा हिंदुराव शेळके,राजेंद्र पंढरीनाथ यादव,आदर्श उत्तम मोरबाळे,सचिन दामोदर नाकील,संदीप आण्णासी तारळ,प्रथमेश विश्वनाथ कांबळे,रियाज जब्बार चिकोडे,रमेश कृष्णा पाटील,भानुदास बाबुराव तासगावे,संजय महादेव कांबळे,जया संजय कांबळे,अस्लम सय्यद हाजी,सचिन किरण बेलेकर यांचा समावेश आहे.