महायुती भक्कम! मविआमध्ये फूट…..

सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस गती घेऊ लागला आहे. उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह तळपत्या उन्हात प्रचारात धडका लावला आहे. महायुतीचे संजय पाटील, ‘मविआ’चे चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या प्रामुख्याने लढत आहे.उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह तळपत्या उन्हात प्रचारात धडका लावला आहे. महायुतीचे संजय पाटील, ‘मविआ’चे चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या प्रामुख्याने लढत आहे. तालुक्यात मातब्बर असलेल्या बाबर-पाटील गटाने संजय पाटील यांच्या मागे ताकद उभी केली आहे.

परिणामी, एकीकडे संजय पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे. दुसरीकडे, चंद्रहार पाटील (Chandrahar Patil), विशाल पाटील यांनी तालुका पिंजून काढला आहे. महायुती, ‘मविआ’तील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते पाळणार का, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील खानापूर (Khanapur) तालुका हा महत्त्वाचा मानला जातो. खानापूर तालुक्यातील मताधिक्यावर निवडणूक निकाल अवलंबून असतो.

आजवर लागलेल्या निकालावरून दिसून येते.खासदार संजय पाटील यांना अनिल बाबर, सदाशिव पाटील, सुहास शिंदे गटाने पाठिंबा दिला आहे.‌ तालुक्यात संजय पाटील यांची ताकद वाढली, असे चित्र असले तरी विशाल पाटील यांचे गावोगावी बाबर-पाटील समर्थकांकडून जोरदार स्वागत होत आहे.‌ बाबर-पाटील हे कार्यकर्त्यांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना कितपत यश येईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.विशाल पाटील यांची तालुक्यात दुसरी फेरी झाली आहे. मतदान चार दिवसांवर आले तरी संजय पाटील अद्याप फिरकले नाहीत.

दोन दिवसांपूर्वी ‘मविआ’चे चंद्रहार पाटील यांची विट्यात सभा झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) नेत्यांनी हजेरी लावली. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी दांडी मारली. विश्वजित कदम येणार होते. तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत सभेकडे पाठ फिरवली. यावरून ‘मविआ’मध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात आहे, याचा प्रत्यय आला. पाटील यांना त्यांच्या ‘होम ग्राउंड’वर मत मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार, हे निश्चित.