महाविकास आघाडीचे उमेदवार आ. राजूबाबा आवळे यांनी भादोले येथील भद्रेश्वर मंदिरातून प्रचार पदयात्रेचा शुभारंभ केला. विधानसभेची ही निवडणूक सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. नेत्यांनी पक्ष सोडला परंतु निष्ठावंत शिवसैनिक हा महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या पाठीशी ठाम उभा आहे असा विश्वास माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी नगराध्यक्ष संजय आवळे, भादोले गावचे नेते धोंडीराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार आवळे म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये केलेली विकास कामे घेऊन तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी तुमच्या दारी येणार आहे. हा प्रचार नुसता निवडणुकीचा टप्पा नाही तर तुमच्या विश्वासाला मान देऊन त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा संकल्प आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि साथीने हातकणंगले मतदारसंघाचा विकास निश्चितच गगनाला भिडेल हा विश्वास आहे. आज तुम्ही दाखवलेला प्रतिसाद, दिलेली साथ ही फक्त पदयात्रेची सुरुवात नसून विजयाचा एल्गार असल्याची खात्री पटली.