कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ पट्टणकोडोली येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. जनसुराज्य पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या अशोकराव माने यांना विधानसभा निवडणुकीसाठी उभे केले असून आगामी २३ नोव्हेंबर रोजी इथे त्यांच्याच विजयाचा भंडारा उधळला जाईल. त्यासाठी ‘नारळाची बाग’ ही त्यांची निशाणी लक्षात ठेवून त्यांना विजयी करावे. या विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवून सर्वांगीण विकास करण्यासाठी जनसुराज्य पक्षाच्या महायुतीतील उमेदवारालाच प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे तसेच शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी – आरपीआय – जनसुराज्य आणि ताराराणी आघाडी या महायुतीतील घटकपक्षांचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हातकणंगलेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
