सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी शासन निर्देशानुसार आणि आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीने मतदान जनजागृती करण्यात आली. महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच इचलकरंजी शहरातील विद्यार्थी, विविध क्रीडा संस्थांच्या सहभागातून मंगळवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते श्री शिवतीर्थ येथे या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. तेथून के. एल. मलाबादे चौक, राजवाडा चौक, झेंडा चौक, प्रकाश उत्तम टॉकीज, छ. संभाजी चौक ते पुन्हा श्री शिवतीर्थ या ठिकाणी सदर रॅलीचा समारोप करण्यात आला.
Related Posts
इचलकरंजी पथविक्रेता निवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेस, माकपची सरशी
सध्या चालू असलेल्या राजकीय वातावरणात नुकताच झालेल्या पथविक्रेत्याची चुरशीने निवडणूक पार पडली. इचलकरंजी शहर पथविक्रेता समिती निवडणुकीसाठी ८४२ मतदारांपैकी ६०८…
इचलकरंजी पूरग्रस्तांसाठी रवींद्र माने यांनी दिला मदतीचा हात….
सध्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. कोल्हापूर सांगली या ठिकाणी अनेक नागरिकांचे स्थलांतर…
मुश्रीफांना इचलकरंजीबाबत घ्यावं लागणार नमतं…?
जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. विशेषतः पाण्यासारख्या संवेदनशील प्रश्नात राजकारण होऊ नये, अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. त्यानुसार…