सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा पराभव केला. तसेच, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनाही पराभवाला सामोरे जावं लागलं.यानंतर विशाल पाटील यांचं बंड ‘सांगली पॅटर्न’ म्हणून महाराष्ट्रात गाजतंय. पण, मिरजेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत विशाल पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला.या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.
या सभेत खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे दिसून आले. या प्रचार सभेत विशाल पाटील यांनी कोणी काही बोललं तरी मिरज विधानसभेत मशाल सोबत विशाल पण आहे. शिवाय हातात घड्याळ पण आहे आणि हातात मशाल पण आहे असे विधान केले. यानंतर जयंत पाटलांनी आपल्या भाषणात विशाल पाटील यांना चिमटा काढला.