माझी उमेदवारी म्हणजे जनतेची उमेदवारी; सुहास भैया बाबर

खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघातील विसापूर सर्कलमधील निंबळक येथील मान्यवर मंडळींनी शिवसेनेत प्रवेश करून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास भैया बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला. बाबर यांच्या हस्ते हा प्रवेश झाला. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा मिळत असल्याने माझी उमेदवारी म्हणजे जनतेची उमेदवारी असल्याचे सुहास भैया बाबर यांनी सांगितले.

निंबळक येथील संजय जाधव, गणपती गुरव, रोहित जाधव, संदीप जाधव, पुण्यवान साळुंखे, बबन शिंदे, उमेश जाधव, सुशांत जाधव, निलेश गुरव, अशोक गुरव, सोमनाथ साळुंखे, अरविंद शिंदे, सुरेश शिंदे, बळवंत शिंदे, सर्जेराव शिंदे, सागर साळुंखे, अविनाश साळुंखे, संतोष साळुंखे, माजी व्हा. चेअरमन आनंदा साळुंखे यांनी शिवसेना गटात प्रवेश केला.

हा मतदारसंघ सुहास भैया बाबर यांच्याकडे मोठया आशेने पाहतो आहे. त्यांच्यासारखे उच्चशिक्षित असले तरी शेती व मातीशी नाळ असलेले नेतृत्व आम्हाला आमदार म्हणून मिळत असेल तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. निबंळक गावातून त्यांना मोठे मताधिक्य देऊ असे आश्वासन पक्षप्रवेश केलेल्या मान्यवरांनी केले.