काँग्रेससह महाविकास आघाडी महिलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य पर्याय- प्रियांका आवळे

हुपरी येथील वाळवेकर नगर, संभाजी मानेनगर झोपडपट्टी, होळकर नगर, शाहूनगर, शिवाजीनगर, विशाल नगर आदीसह शहरातील वसाहतीत आयोजित पदयात्रा, घर टू घर भेटी घेण्यात आल्या. हुपरीसह परिसरात आमदार राजूबाबा आवळे यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा डोंगर उभारला आहे. या कामाच्या जीवावरच महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा हे सहज निवडून येतील, असा विश्वास प्रियांका राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केला. प्रियांका आवळे पुढे म्हणाल्या, शिंदे सरकारने लाडक्या बहिणीसाठी १५०० रुपये देऊन दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूचे दर दुप्पट वाढवून सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील करुन ठेवले आहे. अशा लबाड व बहिणीसाठी बेडगी प्रेम दाखवणाऱ्या तसेच राज्यात महिलांवरील अत्याचार होत असताना केवळ मतांसाठी उपयोग करणाऱ्या ढोंगी महायुती सरकारला सत्तेवरून खाली खेचा.

देशात व राज्यातील महायुती सरकारचे कारनामे बघता सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारीसह अनेक समस्येने मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय फक्त कॉंग्रेस व महाविकास आघाडीच देऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीत राजूबाबा आवळे यांना पुन्हा संधी द्या.

यावेळी उज्वला संजय आवळे, माजी नगरसेविका आक्काताई आवळे, नंदा आवळे, मिना कोरे, मंगल घाटगे, सखुबाई भंडारे, रुक्मिणी कोरे, छाया आवळे, कमल जिरगे, इंदुबाई दाबाडे, पुनम जिरगे, संगिता कांबळे, सुनील कोरे, सुर्यकांत रावण, सुरज जिरगे, प्रशांत दाबडे, भूपाल घाटगे, शंकर वडर, संजय दाबाडे, अमित भंडारे आदीसह शहरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.