हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली. तसेच मंगरायाचीवाडी येथे पदयात्रा काढण्यात आली. हातकणंगले मतदारसंघाचे आमदार राजूबाबा आवळे हे सलग पाच वर्षे सर्वाधिक निधी खर्च करणारे आमदार ठरले आहेत.
त्यांनी गावागावात विकासकामे करून सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी राहणे हे आमचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन माजी सरपंच प्रकाश झिरगे यांनी केले. संभापूर येथे प्रचारफेरीवेळी ते बोलत होते. तसेच मंगरायाचीवाडी येथे पदयात्रेला गावकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रकाश झिरगे म्हणाले, आमदार झाल्यापासून राजूबाबा आवळे हे निधी खर्च करण्यात नेहमी पुढे राहिले. जिल्ह्यातील अनेक आमदारांचा निधी वाया गेला मात्र राजूबाबा आवळे यांनी आपला एक रुपयाचाही निधी वाया जावू न देता दरवर्षी तो खर्च करण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी १०५ टक्के निधी खर्च करून अनोखा विक्रमच केला.
तसेच जेवढे केले तेवढे काम ते सांगत आहेत. त्यामुळे हातकणंगलेतील सर्वसामान्य जनतेला आपला नेता जवळचा वाटतो. राजूबाबा आवळे यांच्या कामाची मतदारसंघातील जनता नक्की दखल घेईल व त्यांना पुन्हा संधी देईल.
