शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या मशालीची सर्वात जास्त धग शहाजीबापू पाटील गटासह शेकापला जाणवली आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी दिपकआबा साळुंखे पाटील यांना जाहीर झाल्यानंतर शहाजीबापू पाटील गटासह शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली आहे.
एक-एक करत अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते अखेरचा रामराम करीत पक्ष सोडून दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत. एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे शहाजीबापू पाटील गटातील सध्याचे नेतृत्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून सांगोला तालुक्यातील देवळे येथील शहाजीबापूंच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची धगधगती मशाल हाती घेतली आहे.देवळे गावातील शहाजीबापूंच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी अखेरचा रामराम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सांगोला तालुक्यातील देवळे येथील नितीन बाबासो सोनवले, सुग्रीव सोनवले, नंदकुमार सोनवले, नरेंद्र गाडे, मच्छिंद्र सोनवले, भीमराव कसबे, प्रवीण गाडे, शिवाजी सोनवले, अभिमान सोनवले, प्रकाश कांबळे, सुनील कांबळे, गोरख सोनवले, सचिन सोनवले, किसन जावीर, सलीम मुलाणी (मांजरी), समाधान वाघमारे, संजय जाधव या शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा रामराम ठोकत दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची मशाल हाती घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील, माजी सरपंच सचिन शिनगारे, नंदकुमार दिघे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.