काल बॅगेची तपासणी, आज उद्धव ठाकरेंच्या विमानाला उड्डाणाची परवानगी नाकारली, समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सभांचा धडका सुरू आहे, आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यांच्या विमानाला लातूरमधून उड्डाणास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे लातूर विमानतळावर अडकून पडले असून, त्यांच्या विमानाचं टेक ऑफ रखडलं आहे. यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रचार सभांना विलंब होत असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.

आज उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र त्यांच्या विमानाला लातूरमधून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विमानाचं टेक ऑफ रखडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सोलापूरकडे येणाऱ्या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोणातून जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांचं विमान सोलापुरात लँड होणार नाही तोपर्यंत कोणत्याही विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात येणार नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विमानाच टेक ऑफ रखडलं आहे. दरम्यान यावरून आता शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रचार सभेला विलंब होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.