विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. इस्लामपूर या जयंतरावांच्या होमपीचमध्ये जाऊन अजितदादांनी चांगलीच बॅटींग केली.महाविकास आघाडीला केलेल्या अनेक घोषणा यांच्या बापाला तरी पूर्ण करता येतील का? असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित केलो होता. त्याला जयंतरावांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री सांगलीला गेले होते. त्यांनी सांगितलं एवढ्या योजना केल्यात, यांच्या बापालाही पूर्ण करता येणार नाही… अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार… बापाचा विषयच नाही इथे… काकाच हा सगळा विषय पूर्ण करणार. तुम्ही चिंताच करू नका,” असं म्हणत जयंतरावांनी अजितदादांना डिवचलं आहे.लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “लोकसभेआधी त्यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेला बहिणीला विरोध होता. लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्यात. पण आमच्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांना फसणार नाही. महिला, मुलींवर अत्याचार होतात, असे जयंत पाटील म्हणाले.
