राजूबाबा आवळे यांना मताधिक्य देण्याचा महिलांचा एकमुखी निर्धार! प्रियंका आवळे यांचा झंझावाती दौरा

हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचे युवा कार्यसम्राट आमदाराचे बाबा आवळे यांच्या प्रचारार्थ प्रियंका राजू बाबा आवळे यांचा अंबप, पाडळी या गावात झंझावाती दौरा झाला. यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी बोलताना प्रियंका आवळे म्हणाल्या, पाच वर्षात आमदार राजू बाबा आवळे यांनी 255 कोटीचा भरगोस निधी देऊन मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभारलाय संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष असताना हजारो गोरगरीब जनतेला पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अंबप, पाडळी गावातील महिलांनी राजू बाबा आवळे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी केला.