आटपाडीतील दादरे, गुरुकुल विद्यालयातर्फे निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातून मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘आला लोकशाहीचा सण साजरा करू आनंदानं’ अशा घोषणा देत मतदान जागृती केली.
यावेळी आपल्या पाल्यांचे मतदान जनजागृती फेरी बघून पालकांनी दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला. यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे, प्रशांत चंदनशिवे, श्रीरंग वायदंडे, आटपाडी पोलिस प्रशासन, तसेच मुख्याध्यापक पोपट साळुंखे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.