आटपाडी ग्रामपंचायतची नगरपंचायत होऊन आता दोन वर्षे पूर्ण झालेले आहेत. सध्या नगरपंचायतवर प्रशासन काम करीत आहे. आटपाडी शहरातील कचरा, पाणी, नागरिकांचे कार्यालयीन प्रश्न या सर्व घटकांचे प्रश्न नगरपंचायत प्रशासनाकडून सोडविले जात नाहीत .
तसेच कर्मचारी नियोजनबद्ध काम करीत नसल्याची नागरिकांची तक्रार असल्यामुळे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आटपाडी नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांना विकास कामाबद्दल हलगर्जीपणा करू नका. तसेच नागरिकांचे जे काही प्रश्न असतील, त्यांच्या समस्या असतील त्या समस्या वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत.
तसेच स्थानिक नेते मंडळी कुरघोडी करत असल्याचे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले. त्यांनी कर्मचाऱ्यांची विकास कामाबाबत कानउघडनी केलेली आहे. नागरिकांचे प्रश्न वेळेवर पूर्ण व्हावेत तसेच हलगर्जीपणा चालणार नाही अन्यथा वरिष्ठांकडून कारवाई केली जाईल असे आदेश त्यांनी यावेळी दिलेले आहेत.