महायुतीचे उमेदवार सुहासभैया बाबर यांना मोठया मताधिक्याने निवडून द्या! मतदारसंघातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवू…एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आटपाडी येथे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ भव्य सभा करण्यात आली होती. यावेळी सुहास बाबर, खासदार धैर्यशील माने, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले स्वर्गीय अनिल बाबर यांची उणीव जाणवते आहे.लोकांसाठी काम करणारा हा नेता लोकांसाठी झटला. उठावावेळी ते खांद्याला खांदा लावून उभा राहिले. टेंभूच्या पाण्यासाठी त्यांनी राजकारण विरहित काम केले. सुहास बाबर यांना विजयी करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

खानापूर विधानासभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मोठया मताधिक्याने निवडून द्या. त्यांना मंत्री पद देऊन मतदारसंघातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवू, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मी गरिबी पाहिली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याना पंधराशे रुपयांची किंमत काय कळणार.दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.कुणीही माईक का लाल आला तरी या योजना बंद पडू देणार नाही.लाडक्या बहिणींना सावत्र भावांनी विरोध केला, कोर्टात गेले, कोर्टाने चपराक लागल्यावर दुसऱ्या कोर्टात गेले. आता त्यांना जोडे दाखवा.

ते म्हणाले की, आमची देना बँक आहे. घेना बँक नाही.. पूर्वीच्या सरकारमध्ये हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे होते. परंतु आमच्या सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे देणार आहे. खानापूरात ८ महिन्यात १३५० रुपयांचा निधी दिला. अडीच वर्षाचा निधीच मिळाला नाही तेवढं मी ८ महिन्यात निधी दिला. सर्व राज्यातील मतदारसंघात भरगोस निधी मिळाल्याने विकासकामांना गती मिळाली आहे.३७० कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमधील लाल चौकात आता तिरंगा फडकतोय. आम्ही बदल केल्यानेच हा बदल दिसतोय.